

BKC Bullet Train station
ESakal
मुंबई : मुंबईच्या सतत खालावत चाललेल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता वाढत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या फ्लाइंग स्क्वॉडला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मधील बुलेट ट्रेन बांधकाम साइटवर गंभीर पर्यावरणीय उल्लंघन आढळले. ही कारवाई जीआरएपी ४ अंतर्गत करण्यात आली. जी १ डिसेंबरपर्यंत शहरात लागू होती. बांधकाम साइटवर कडक प्रदूषण नियंत्रण उपाययोजना अनिवार्य करते. जीआरएपी ४ मध्ये कोणत्याही बांधकाम साइटवर धूळ नियंत्रणासाठी मिस्टिंग मशीन, स्प्रिंकलर आणि मिस्ट गन बसवणे अनिवार्य आहे.