mumbai municipal corporation
mumbai municipal corporationsakal

BMC Scam : CM शिंदेंची मोठी घोषणा! मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची होणार SIT चौकशी

कॅग अहवालात आढळून आलेल्या मुंबई महापालिकेतील कामांच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

मुंबई - कॅग अहवालात आढळून आलेल्या मुंबई महापालिकेतील कामांच्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या वर्धापनदिनी चौकशी समिती स्थापनेची घोषणा केली.

गेले काही महिने महापालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने सातत्याने केली होती. अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॅग अहवालातील अनियमिततेची चौकशी करा, अशी मागणी केली होती. अखेर आज चौकशी समिती स्थापनेची घोषणा करण्यात आली. या समितीत मुंबईच्या विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्तही या समितीवर असतील.

महापालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामांमध्ये रुपये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेची अनियमितता झाली, असे महालेखापाल (कॅग) यांनी विशेष लेखापरीक्षा अहवालामध्ये निदर्शनास आणून दिले आहे.

यासंदर्भात अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन अपहाराचा तपास करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याबाबत निवेदन दिले होते. यात कोविड काळात झालेल्या कामाचा समावेश नाही. निविदा न काढता कामांना मंजुरी, मर्जीतील कंत्राटदारांवर मेहेरनजर, असे आरोप भाजप मुंबईचे अध्यक्ष आशीष शेलार यांनीही केले होते.

mumbai municipal corporation
Ekanth Shinde: "ठाकरेंच्या गळ्यातला पट्टा डॉ. एकनाथ शिंदेनी काढला"; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

कॅग अहवालात यासंबंधीच्या अनेक नोंदी करण्यात आल्या आहेत आणि अनियमिततेवर बोटही ठेवण्यात आले होते. यासंदर्भात स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष चौकशी समितीत आर्थिक गुन्हा शाखेचे सह पोलिस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

निवडणुकीमुळे महत्त्व

कॅगच्या अहवालात २१४.४८ कोटी किमतीच्या २० कामांमध्ये अनियमितता असल्याचे आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. पाच विभागांमध्ये झालेल्या एकूण ६४ कामांमध्ये करारनामे झाले नव्हते. कागदपत्रे न ठेवता कामे दिल्याने चौकशी करणेही अशक्य झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही कामे ४ हजार ७५५ कोटींची होती. १३ विभागांनी राबवलेल्या विविध प्रकल्पांचा खर्च ३ हजार ३५५ कोटींचा होता.

mumbai municipal corporation
Mumbai : ठाकरे गटाला पक्षांतराचा धसका! माजी नगरसेवकांची तातडीने बोलावली बैठक

या कामांकडे लक्ष देण्यासाठी तसेच देखरेख करण्यासाठी थर्ड पार्टी अॅग्रिमेंट केली नसल्याचा गंभीर ठपकाही कॅग अहवालात ठेवण्यात आला आहे. महापालिका निवडणुका समोर असल्याने या चौकशीला महत्त्व आले आहे. कोविड काळातील खर्चाची कागदपत्रे वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाने सादर केल्या नसल्याचे कॅग अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com