मुंबई : महानगर पालिकेचे 15 दवाखाने संध्याकाळच्या वेळीही सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : महानगर पालिकेचे 15 दवाखाने संध्याकाळच्या वेळीही सुरु

मुंबई : महानगर पालिकेने 15 दवाखाने संध्याकाळच्या वेळीही सुरु ठेवण्यास सुरवात केली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात 13 दवाखाने संध्याकाळी 4 ते रात्री 11 या वेळेत सुरु ठेवण्याचा नियोजन प्रशासनाने केले आहे.

महानगर पालिकेचे मुंबईत 186 दवाखाने आहेत. हे दवाखाने प्रामुख्याने सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत सुरु असतात.मात्र,आता बदललेल्या जिवनशैली मुळे सकाळच्या वेळी कामगार वर्ग रोजगारात व्यस्त असल्याने ते दवाखान्या पर्यंत येऊ शकत नाही.त्यामुळे महानगर पालिकेने काही वर्षांपुर्वी संध्याकाळच्या वेळीही दवाखाने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.आऊटसोर्सिंग करुन पालिकेने पहिल्या टप्प्यात 15 दवाखाने संध्याकाळी 4 ते रात्री 11 या वेळेत सुरु केले.तर,आता 13 दवाखानेही याच वेळेत सुरु करण्यात येणार आहे.अशी माहिती प्रशासनाने महासभेच्या पटलावर मांडली आहे.

हेही वाचा: मुंबईत विक्रीसाठी आणण्यात येणारी एक कोटीची अवैध दारु जप्त

227 दवाखान्यांची गरज नाही

शिवसेनेच्या प्रियंका सावंत यांनी महानगर पालिकेने 227 प्रभागात सुसज्ज दवाखाने बांधावेत अशी ठरावाची सुचना मांडली होती.त्यावर प्रशासनानाकडून महासभेत ही माहिती मांडण्यात आली आहे.त्याच बरोबर 227 प्रभागात दवाखाने उभारण्याची गरज नसल्याचे प्रशासनाकडून नमुद करण्यात आले आहे.रिंदानी समितीच्या शिफारशीनुसार 50 हजार लोकसंख्ये करीत अथवा 1.5 किलोमिटरच्या परीसरात दवाखाने उपलब्ध असणे आवश्‍यक आहे.असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दवाखान्यात प्राथमिक तपासणी करुन उपचार केले जातात.गंभिर आजार असल्यास रुग्णाला रुग्णालयांमध्ये पाठवले जाते.असेही प्रशासनाकडून नमुद करण्यात आले.

हेही वाचा: नागपूर : उद्योग आले पूर्वपदावर : ९० टक्के लसीकरण पूर्ण

दवाखन्यात काय उपचार

दवाखान्यांमध्ये मलेरीया,डेंगी,मधुमेह रक्त चाचणीही केली जाते.तसेच औषध उपचारही पुरवले जातात.त्याच बरोबर लसिकरणाची मोहीम ताप,सर्दी खोकल्या सारख्या किरकोळ आजाराचीही औषधे दिली जातात.

हे दवाखाने संध्याकाळच्या वेळी सुरु होणार (कंसात प्रभाग )

एस.व्ही.पी रोड दवाखाना (बी),आर.आर.मार्ग दवाखाना (डी),नायगाव प्रसुतीगृह दवाखाना (एफ दक्षिण),शिवडी दवाखाना(एफ दक्षिण),नटरवलाल दवाखाना (के पुर्व),शास्त्रीनगर दवाखाना (आर उत्तर ),गोराई दवाखाना (आर उत्तर ),बैलबाजार दवाखाना (एल ),चांदिवली दवाखाना (एल),मोहिली व्हिलेज दवाखाना (एल),पंतनगर दवाखाना (एन),नाथ पै दवाखाना (एन),साईनाथ दवाखाना (एन)

loading image
go to top