सी.ए. परीक्षेत डोंबिवलीकर राज शेठ याची उत्तुंग भरारी

संजीत वायंगणकर
मंगळवार, 18 जुलै 2017

डोंबिवली : संपूर्ण  देशात  पहिला क्रमांक पटकाविल्याने सर्व स्तरांतून त्याच्यावर आभिनंदनाचा वर्षाव. वाणिज्य शाखेत कठीण समजल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावून महाराष्ट्राची शैक्षणिक उपराजधानी समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

78.75 % गुण मिळवून मे 2017 मध्ये झालेल्या  सी.ए.च्या अंतिम परिक्षेत  राज शेठने यश संपादन केले.राज  विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी तो अॅक्च्युअरी ची पुढील परीक्षा देत आहे. गणीत विषयावर आधारीत अत्यंत कठिण असे एकूण 14 विषयांचा अभ्यास या परिक्षेसाठी करावा लागतो.

यातील तीन विषयात राज उत्तिर्ण झाला आहे. गेल्याच वर्षी यापैकी सी.टी. 2 याविषयात देखील तो देशात पहिला आला आहे. राजचे वडिल परेश हे व्यावसायिक तर आई गृहिणी आहे. एक मोठी बहिण विवाहित गृहिणी असून दुसरी एम.बी.ए. (अर्थशास्त्र) आसून नोकरी करीत आहे. सध्या अभ्यास करण्यावर भर देणार असल्याचे राजने सकाळला सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Mumbai news Dombivli raj sheth tops chartered accountant