

Andheri SRA Building Fire
ESakal
मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील गावदेवी डोंगर परिसरात शुक्रवारी एका एसआरए इमारतीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. आग इतक्या वेगाने पसरली की रहिवासी घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. प्राथमिक वृत्तानुसार, काही लोकांनी भीतीपोटी इमारतीवरून उडीही मारली. माहिती मिळताच, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मदत व बचाव कार्य सुरू केले.