मतिमंद जुळ्या मुलांची हत्या करून जन्मदात्या आईची आत्महत्या

किरण घरत
रविवार, 10 सप्टेंबर 2017

आपण या दोन्ही मतिमंद मुलांना कंटाळून यांचे भविष्यात या मुलांचे या परिस्थितीत काय होईल या भीतीने हा टोकाचा निर्णय घेऊन त्यांची हत्या करून मी गळफास लावून आत्महत्या करीत आहे...

कळवा : खारीगाव पूर्व घोळाईनगर परिसरातील आनंदविहार सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका निर्दयी मातेने आपल्या दोन सातवर्षीय चिमुकल्या मुलांची गळा आवळून हत्या केली आणि स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. 9) दुपारी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

खारीगाव रेल्वे फटका जवळ पूर्वेला असलेल्या घोळाईनगर परिसरातील आनंद विहार सोसायटीच्या बिल्डिंग क्रमांक 13 मध्ये रूम क्रमांक 204 मध्ये संदीप कदम राहतात. ते आमेझांन कंपनी मध्ये व्यवस्थापक आहेत. त्यांना वरद आणि सार्थक ही दोन सात वर्षांची जुळी मतिमंद मुले आहेत. ही दोन मुले जन्मापासूनच मतिमंद आहेत. शनिवारी संदीप कदम नेहमीप्रमाणे कामावर गेले होते ते संध्याकाळी 6 नंतर घरी आले परंतु घराची बेल वाजवली असता त्यांना आतून प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चावीने बंद दरवाजा उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला ह्या दोन्ही मुलांची त्यांच्या पत्नी अर्चना कदम (32) यांनी गळा आवळून हत्या केली व स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कळवा पोलिसांना घटनास्थळी आर्चनानी लिहिलेली सुसाईड नोट मिळाली असून त्यामध्ये आपण या दोन्ही मतिमंद मुलांना कंटाळून यांचे भविष्यात या मुलांचे या परिस्थितीत काय होईल या भीतीने हा टोकाचा निर्णय घेऊन त्यांची हत्या करून मी गळफास लावून आत्महत्या करीत आहे, असे लिहिले आहे.

अंगावर व्रण नाहीत
दरम्यान, या दोन्ही मुलांच्या अंगावर कोणतेही व्रण दिसून येत नाहीत ही हत्या गळा दाबून अथवा तोंडावर उशी ठेवून दुपारी चार ते सहा च्या दरम्यान केली असावी अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. अर्चना आणि दोन्ही मुलांचे मृतदेह विच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर हत्या कशाप्रकारे करण्यात आल्या, हे समजेल, अशी माहिती कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एम. एम. बागवान यांनी दिली. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
आता देताय की जाताय; मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ
जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
नोटबंदीने देशाची फसवणूक केली : पी. चिदंबरम
राजनाथसिंह काश्‍मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा
'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना
स्पर्धा परीक्षांच्या पलीकडं... (संदीप वासलेकर)
मौजा चिंधीमालच्या भिकाऱ्यांचं काय करायचं ? (उत्तम कांबळे)

Web Title: Mumbai news kalwa mother kills twin sons, commits suicide