मुंबई सांताक्रूझ परिसरात 22 वर्षीय तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

आकाशचे वय वय 22 वर्षे होते. तो कापड दुकानामध्ये हेल्पर म्हणून काम करीत होता. तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होता.

मुंबई : सांताक्रूझ (पश्चिम) परिसरातील खोतवाडी येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण मूळचा कोकणातील आहे.

28 मे रोजी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मुख्य नियंत्रण कक्ष येथे 1 कॉल आला झाला की, राम लखनची चाळीतील रूम नंबर 4 मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. सदर कॉलची माहिती प्राप्त होताच सांताक्रूझ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच सदर व्यक्तीची माहिती प्राप्त केली असता असे आढळून आले की त्या मयत इसमाचे नाव आकाश विजय सावंत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. 

आकाशचे वय वय 22 वर्षे होते. तो कापड दुकानामध्ये हेल्पर म्हणून काम करीत होता. तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होता. तसेच त्याच्या मृतदेहाच्या आजूबाजूला चिट्ठी वा संशयित वस्तू आढळून आलेली नाही. त्यामुळे आकस्मित मृत्यू नोंद 49/17 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर हॉस्पिटल येथे रवाना केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व नातेवाईकांचे जबाब घेऊन पोलिस पुढील तपास करत आहेत.

'ई सकाळ'वरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सापाने दंश केल्याने बालकाचा मृत्‍यू 
गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर
योयो परत येणार रे..!!
इंग्रजी शाळांत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश
इंदापुरात राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प
...आता पुढचं आयुष्य फक्त देशासाठीच!
दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री
मॉन्सून आणि मार्केट
आजच्या काळात तुमची खरी कसोटी : विद्यासागर राव
सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात

Web Title: mumbai news santacruz area youth suicide