Mumbai News: माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नावे व्यावसायिकांना धमक्या; पैसे उकळणाऱ्या एकाला अटक

माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नावे व्यावसायिकांना धमक्या; पैसे उकळणाऱ्या एकाला अटक | Threats to businessmen on behalf of former corporator Ramesh Mhatre; A person who extorted money was arrested
Kalyan crime News
Kalyan crime Newssakal

Dombivali News: शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या नावे व्यावसायिक उद्योजक यांना फोन करून पैसे उकळणाऱ्या दोघा भामट्यांना विश्व नगर पोलिसांनी अटक केली आहे.

संदीप उत्तम शिंदे (वय 30), बेघाजी रोहिदास दबाले (वय 34) अशी आरोपींची नावे आहेत. यातील बेघाजी याला अटक करण्यात आली आहे. मी माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे बोलतो. मला काही लोकांना पैशांची मदत करायची आहे. तेव्हा तुम्ही मला पैशाची मदत करा असे सांगून काही व्यावसायिकांकडून हे दोघे पैसे वसूल करत होते.

Kalyan crime News
Navi Mumbai News: प्रदूषणामुळे कामोठ्यातील नागरिक हैराण; नागरीकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या नावाने व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या संदीप शिंदे व बेघाले रोहिदास दबाले या दोघांचा पर्दाफाश झाला आहे. त्यातील दबाले हा डोंबिवली पश्चिम येथील ठाकूरवाडी फुलेनगरमध्ये राहतो.

डोंबिवलीतील काही व्यावसायिक, उद्योजकांना हे संपर्क करत असत. संदीप हा रमेश म्हात्रे यांच्या नावाने त्यांना फोन करायचा. मी माजी नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे बोलतो. मला काही लोकांना पैशांची मदत करायची आहे. तेव्हा तुम्ही मला पैशाची मदत करा असे सांगून काही व्यावसायिकां कडून हे दोघे पैसे वसूल करत होते. मी एक इसम पाठवीत आहे.

त्याच्याकडे तुम्ही तात्काळ पैसे द्या असे तो सांगत असे. ते पैसे घेण्यासाठी दबाले हा जात असे. या संदर्भाची माहिती माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मिळताच त्यांनी अशाप्रकारे पैसे उकळणाऱ्या इसमांचा आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शोध सुरू केला.

Kalyan crime News
Navi Mumbai News: नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत होणार वाढ; प्रवाशांना मिळणार दिलासा

डोंबिवलीतील औषध विक्रेत्या सुरज विश्वकर्मा यांना अशाच प्रकारे या दोघांनी संपर्क केला. आपण रमेश म्हात्रे बोलतोय आपणास एकाला पैसे द्यायचे आहेत. त्यासाठी सहकार्य करा. आपण एक इसम पाठवतो त्याच्याकडे तात्काळ पैसे द्या. अशी मागणी केली. विश्वकर्मा यांनी ही माहिती तात्काळ म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दिली.

दबाले हा नेहमीप्रमाणे विश्वकर्मा यांच्याकडे पाचशे रुपये घेण्यासाठी येताच, तिथे सापळा लावून बसलेल्या म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी दबाले यास औषध विक्रेत्याकडून पैसे घेताना रंगेहात पकडले. त्याला पकडताच म्हात्रे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दबाले यास विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर केले. त्यावेळी त्यांने आपण रमेश म्हात्रे यांच्या नावाने पैसे उकळत असल्याची कबुली पोलिसांना दिली.

Kalyan crime News
Mumbai News: विरार-अलिबाग महामार्ग फास्ट ट्रॅकवर; विकासाला मिळणार गती

आपल्या नावाने बेकायदा रीतीने पैसे वसूल करून, आपली समाजात बदनामी केली म्हणून म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून संदीप याचा शोध सुरू आहे.

त्यांनी आतापर्यंत असे किती प्रकार केले आहेत याचा तपास सुरू केला आहे. याच्या अटकेनंतर अनेक नागरिकांनी, व्यावसायिकांनी या दोघांनी आपणास फसवले असल्याचे रमेश म्हात्रे यांना कळविले आहे.

Kalyan crime News
Mumbai News : १० लाख मेट्रिक टन गाळ काढण्याचे आव्हान मात्र नालेसफाईत आचारसंहितेचे विघ्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com