Kalyan Loksabha: आणखी एक मोहरा गळाला ! उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावंताचा राजीनामा, शिंदे गटाकडे वाटचाल की निवृत्ती?

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र, शिंदे गटाकडे वाटचाल की निवृत्ती होतेय चर्चा
mumbai
mumbai sakal
Updated on

डोंबिवली - मातोश्री'' च्या खास विश्वासातील व ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांची मागील वर्षी शिवसेनेत कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख पदी निवड झाली होती. गोपाळ लांडगे यांनी पदाचा राजीनामा देत शिंदे यांना समर्थन दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थरवळ यांची या पदी निवड केली होती. मात्र अवघ्या 15 महिन्यातच थरवळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मी एक निष्ठावान शिवसैनिक आहे. आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. आत्ताही या क्षेत्रातील नागरि समस्या सोडविण्यासाठी तसेच येथील नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करु असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते.

मात्र आता माज्याकडून अपॆक्षीत काम होत नसल्याचे वाटते म्हणून राजीनामा देत असल्याचे थरवळ यांनी सांगितले आहे. मात्र या राजीनामामागे शिंदे गटाकडे वाटचाल की निवृत्ती याच्या चर्चा रंगल्या आहेत.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण, डोंबिवलीसह अंबरनाथ, उल्हासनगर येथील शिंदे समर्थक गटातील नगरसेवकांनी शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केला होता.

ठाकरे यांच्या निष्ठावान गटातील सुभाष भोईर, सदानंद थरवळ, प्रभाकर चौधरी, तात्या माने, भय्या पाटील, रमेश जाधव यांसारख्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्या सोबत कायम असल्याचे सांगितले होते.

mumbai
Mumbai : केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या भेटीसाठी जे जे मध्ये चित्रकला प्रदर्शन

कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी देखील प्रथम ठाकरे यांना पाठींबा जाहीर केला होता. मात्र नंतर त्यांनी पलटी मारत शिंदे यांना पाठींबा जाहीर करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे देखील शिंदे गटात सामील झाले होते.

यामुळे या रिक्त पदांवर कोणत्या निष्ठावान शिवसैनिकांची वर्णी लागते याविषयी गेले काही दिवस चर्चा सुरु होती. डोंबिवली, कल्याण ग्रामीण व मुंब्रा कळवा हा विधानसभा क्षेत्रासाठी थरवळ यांची निवड करण्यात आली होती. मागील वर्षी जुलै महिन्यात या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.

mumbai
Mumbai Breaking: ४० वर्षांपासून फरार वाँटेड आरोपी अखेर अटकेत

शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक आणि आनंद दिघे यांच्या तालमीतील निष्कलंक, निष्ठावान अशी थरवळ यांची ओळख. ते 42 वर्ष शिवसेनेत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आनंद दिघे यांचे खास विश्वासू दूत होते.

अशाच दूतांमधील दिघे यांची डोंबिवलीतील जोडगोळी म्हणजे सदानंद थरवळ, दिवंगत नितीन मटंगे होते. महत्वाची बैठक, पालिका निवडणुका, पालिका पदाधिकारी निवडणुकांमध्ये दिघे या दोघांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेत होते.

थरवळ हे पालिकेत नगरसेवक होते. स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. डोंबिवली उपजिल्हाप्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत. डोंबिवलीत शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातील रामनगर मधील बालभवन प्रकल्प मार्गी लावण्यात थरवळ यांचा सिंहाचा वाटा आहे.

दोन वेळा ते डोंबिवली शहराचे शहरप्रमुख होते. या कालावधीत थरवळ यांनी शिवसेनेतर्फे लोकहिताचे अनेक उपक्रम राबविले.

थरवळ यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि डोंबिवलीकर असलेल्या रश्मी ठाकरे यांच्या बरोबर घरोब्याचे संबंध आहेत. येत्या काळात शिवसेनेला या भागात मजबूत करण्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांची फळी उपयोगी येणार असल्याने या फळीतील एक हरहुन्नरी शिवसैनिक म्हणून थरवळ यांची निवड करण्यात आली होती.

mumbai
Uddhav Thackeray: शिवाजी पार्कवरील मेळाव्याची दणक्यात तयारी सुरू

15 महिन्यानंतर अखेर थरवळ यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्याने यामागे कारण काय याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाचा दबाव थरवळ यांच्यावर येत आहे का ? की ते राजकारणातून निवृत्ती घेऊन मुलाला प्रमोट करत आहेत याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com