

Mumbai Housing Row Over Food Habits Grows As MNS Files Complaint And Thackeray Shiv Sena Launches Strong Protest
sakal
मुंबई : मुंबईत घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात खाद्यसंस्कृतीवरून भेदभाव होत असल्याच्या आरोपावरून राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. ‘मांसाहार करत असाल तर फ्लॅट घेऊ नका’ अशा आशयाची जाहिरात समाजमाध्यमांवर प्रसारित झाली हाेती. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट पोलिसांत धाव घेतली आहे. दुसरीकडे सोसायट्यांच्या नियमांत हस्तक्षेप करू नये, अशी सावध भूमिका भाजपने घेतली आहे.