मुंबई : शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे पालकांनी केले स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे पालकांनी केले स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा आणि वर्ग सुरू होणार असल्याने त्याचे राज्यातील पालक, शिक्षक आणि शाळा संघटनांनीही स्वागत केले आहे. सरकारने घेतलेला निर्णय हा पालकांच्या हितासाठीच असून त्यामुळे मागील दोन वर्षांपासून शाळेचे तोंड न पाहिलेले विद्यार्थी शाळेत जातील त्यामुळे हा निर्णय एकुणच स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटल्या आहेत.

राज्यात पहिली ते सातवी या तब्बल 1 कोटी 34 लाख 85 हजार 879 विदयार्थी शिक्षण घेत आहेत. तर या शाळांमध्ये 5 लाख 12 हजार 063 शिक्षक कार्यरत आहेत. या शाळा सुरू होत असल्याने पालकांनी सरकारचे स्वागत केले आहे. सिस्कॉम संस्थेच्या शिक्षण प्रमुख वैशाली बाफना यांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन प्रत्येक वर्गात केवळ 20 आणि त्याहून कमी विद्यार्थी बसतील यासाठी कायमस्वरूपी कायद्यात बदल करण्यासाठी अधिसूचना जारी करण्याची मागणी केली केली.

हेही वाचा: गुरुपुष्यामृत योग! 'या' मौल्यवान गोष्टी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस

अखिल भारतीय पालक संघटनेचे मुंबईतील पदाधिकारी प्रसाद तुळसकर म्हणाले की, पहिलीपासूनच्या शाळा सुरू करण्यासाठी अनेकदा सरकारकडे विनंती केली होती, आता निर्णयच झाला असल्याने त्याचे स्वागत आहे. मात्र यापुढे ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली जो गोंधळ सुरू होता तो आता सरकारने आटोक्यात आणावा अशी मागणी केली. तर मागासवर्गीय विद्यार्थी पालक-संघटनेचे अध्यक्ष प्रविण यादव यांनी सरकारने घेतलेला निर्णयाचे स्वागत करत आता सरकारने शाळांकडून अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून शाळा या तीन सत्रात घेण्याची तरतूद करण्याची मागणी यादव यांनी केली.

हेही वाचा: इचलकरंजीत १७ टक्के बनवेगिरी : वयाची चोरी करून पेन्शनची खाती

राज्यातील शाळानिहाय शिक्षक, विद्यार्थ्यांची संख्या (पहिली ते सातवी)

शाळेचा प्रकार विद्यार्थी प्राथमिक शिक्षक उच्च प्राथमिक

सरकारी 49,63,872 1,84,307 51,914

खासगी अनुदानित 42,30,974 55,051 77,977

खासगी विनाअनुदानित 41,84,735 87,541 51,007

मदरसे व अन्य 1,06,298 3065 1201

मुंबई विभागातील शाळा, विद्यार्थी संख्या (पहिली ते सातवी)

विभाग शाळा विद्यार्थी

मुंबई महापालिका 2541 6,64,214

मुंबई डीवायडी 1802 5,08,218

ठाणे 4958 10,82, 536

रायगड 3711 3,32,536

पालघर 3448 5,30,573

loading image
go to top