
Video: खाकी वर्दीतील कलाकाराचा बासरी वादनाचा व्हिडीओ व्हायरल
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 'संडे स्ट्रीट' (Sunday Street) ही संकल्पना शहरात सुरु केली आहे. या संकल्पनेला मुंबईकर उत्तम प्रतिसाद देत आहे. अशातच रविवारी वडाळ्यातील आरएके मार्गावर एका पोलिस अधिकाऱ्याने सुरेल बासरी वादन केले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (mumbai police sub inspector played a flute on sunday street goes viral on social media)
हेही वाचा: संतापजनक! सत्तरीच्या वृद्धाने केला १० वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग
या व्हायरल व्हिडीओमध्ये रविवारी आयोजित केलेल्या संडे स्ट्रीट' मध्ये मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याच्या आतील कलेचे दर्शन झाले. या पोलिस अधिकाऱ्याने सुरेल बासरी वादन केले. दादासाहेब कुळे असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. रफी अहमद किडवई मार्ग पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेत आहेत. त्यांनी त्यांच्या सुरेल बासरीवादनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.
हेही वाचा: दाऊदच्या जवळच्या २० व्यक्तींवर मुंबईत छापे; NIA चं सर्च ऑपरेशन
मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या संकल्पनेतून संडे स्ट्रीट हा उपक्रम सुरू झाला आहे. मुंबईतील 13 रस्त्यांवर सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत हा उपक्रम राबवला जात आहे. या दरम्यान रस्त्यावर चालणे, सायकलिंग, स्केटिंग, योगासने करता येतात व मुले खेळू शकतात.
Web Title: Mumbai Police Sub Inspector Played A Flute On Sunday Street Goes Viral On Social Media
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..