मुंबई : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ कँडल मार्च | mva government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Candle March

मुंबई : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ कँडल मार्च

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : यवतमाळ (Yavatmal) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Government medical hospital) वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या हत्येच्या (medical student murder) निषेधार्थ मुंबईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही निदर्शने (Protest) करण्यात आली. मुंबईतील पालिका रुग्णालयांपैकी केईएम रुग्णालयाच्या (Kem hospital) वैद्यकीय विद्यार्थ्यांनी कँडल मार्च (candle march) काढला. या निदर्शनाद्वारे रुग्णालय परिसराचे वातावरण डॉक्टरांसाठी भयमुक्त करण्याची मागणी डॉक्टरांनी सरकारकडे (mva government) केली आहे.

हेही वाचा: नवी मुंबई : क्रेडीट कार्डमधून परस्पर ६५ हजाराची खरेदी; गुन्हा दाखल

बुधवारी रात्री यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या निषेधार्थ वैद्यकीय विद्यार्थ्यांनी शनिवारी नागपूर, विदर्भ, अकोला आणि यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धरणे आंदोलन केले. मुंबईतही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला. एएसएमआई या इंटर्न डॉक्टरांच्या संघटनेच्या बॅनरखाली वैद्यकीय विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री 8 वाजता केईएम रुग्णालय परिसरात कँडल मार्च काढून यवतमाळ घटनेचा निषेध केला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतिक देबाजे म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षेतील त्रुटी दूर कराव्यात. महाविद्यालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस व्यवस्था करून रुग्णालयातील डॉक्टरांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षेचा चक्रव्यूह

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. अशोक पाल या वैद्यकीय विद्यार्थ्याच्या हत्येचे प्रकरण चर्चेत आले आहे. या हत्येबाबत निवासी डॉक्टरांच्या विरोधामुळे खडबडून जागे झालेले प्रशासन महाविद्यालयांमध्ये सुरक्षेचा चक्रव्यूह निर्माण करणार आहे. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या अहवालानंतर प्रशासन सुरक्षेच्या दिशेने पावले उचलणार आहे.

हेही वाचा: कंगना राणावत विरोधात पालघरमध्ये तक्रार

विद्यार्थी अशोक पाल हत्येनंतर येथील निवासी डॉक्टरांनी आंदोलन केले. एवढेच नाही तर त्यांची ओपीडी सेवाही बंद करण्यात आली होती. या बंददरम्यान येथील वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा नसल्याचा मुद्दा येथे शिकणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी मांडला. डॉक्टरांच्या आंदोलनामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा चक्रव्यूह तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयचे डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, सुरक्षेच्या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सुरक्षिततेबाबत आपला अहवाल सादर करणार आहे. समितीच्या शिफारसीनुसार कॉलेजमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्याबरोबरच ज्या महाविद्यालयांमध्ये सुरक्षेचा अभाव आहे तेथे सुरक्षा कर्मचारी, पोलीस गस्त आदी वाढवण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य आहे.

loading image
go to top