Mumbai-Pune Traffic: मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या रांगा; काय आहे कारण

उपनगरीय रेल्वे प्रकल्पाचे परिणाम: कळंबोलीत वाहतूकीची कोंडी, नागरिकांमध्ये संताप
Express Way traffice mumbai pune kalamboli
Express Way traffice mumbai pune kalamboli sakal

Express Way News: कर्जत-पनवेल दुहेरी मार्गावर चिखले रेल्वे स्थानकाजवळ उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पातील पुलाचे काम करण्यात येत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे कळंबोली येथे मोठी वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे.

Express Way traffice mumbai pune kalamboli
Pune-Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सेवा रस्ते करा, संतप्त ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तीन तास ही मार्गिका पूर्णपणे बंद राहणार असल्याचे महामार्ग पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी पत्रक काढून जाहीर केले आहे. पुणे बाजूकडे जाण्यासाठी सर्व प्रकारची वाहने कळंबोली सर्कल - टी पॉईंट- करंजाडे - पळस्पे मार्गे NH 48 जुना मुंबई पुणे महामार्गाने पुणे बाजुकडे वळविण्यात आलेली आहेत. यामुळे ही वहातुक कोंडी झाली आहे. (mumbai pune old highway )

Express Way traffice mumbai pune kalamboli
Express Way Block: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे राहणार दोन तास बंद!

पनवेल ते कर्जत मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. या प्रकल्पात चिखले रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेमुळे हा रेल्वे मार्ग विभागला जातो. या ठिकाणी स्थानकाजवळ लोखंडी पूल टाकण्याचे काम रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.(express way important News)

Express Way traffice mumbai pune kalamboli
Mega Block : तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com