
Mumbai Pune Expressway traffic close
ESakal
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मार्गावर वाहतूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) कडून वीज संबंधित काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी एक तासाची संपूर्ण वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करून देण्यात आली आहे.