

Safety First: MSRDC to Clear Vulnerable Hillsides Along Major Maharashtra Expressways
sakal
-बापू सुळे
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या (कनेक्टिंक लिंक) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने (एमएसआरडीसी) धसका घेतला आहे. ‘दुधाने तोंड पोळल्याने’ आता ‘एमएसआरडीसी’ ताकही फुंकून पिण्याच्या तयारीमध्ये आहे. ‘मिसिंग लिंक’ आणि समृद्धी द्रुतगती मार्गावर पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून परिसरातील धोकादायक नसलेल्याही दरडी काढल्या जातील. या प्रक्रियेसाठी लवकरच पाहणी करण्यात येईल. पाण्याचे प्रवाह देखील वळविण्याचा विचार सुरू आहे.