

Mumbai Monsoon Gains Pace, Yellow Alert in Effect
गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना पहाटेच्या पावसामुळे दिलासा मिळाला. रविवारी पहाटेपासून मुंबईसह उपनगरात पावसाने हजेरी लावली. काही भागात जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात २० जूननंतर पावसाची शक्यता आहे.