esakal | मुंबईतील पावसाचा जोर ओसरला; मध्य भारतातून मान्सुनचा परतीचा प्रवास सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील पावसाचा जोर ओसरला; मध्य भारतातून मान्सुनचा परतीचा प्रवास सुरु

महाराष्ट्रात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात सरकल्यामुळे मुंबईसह कोकणात उद्या पासून मंगळवार पर्यंत मेघगर्जनेसह पावसाच्या काही सरी कोसळण्याची शक्‍यता आहे.

मुंबईतील पावसाचा जोर ओसरला; मध्य भारतातून मान्सुनचा परतीचा प्रवास सुरु

sakal_logo
By
समीर सुर्वे


मुंबई : महाराष्ट्रात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात सरकल्यामुळे मुंबईसह कोकणात उद्या पासून मंगळवार पर्यंत मेघगर्जनेसह पावसाच्या काही सरी कोसळण्याची शक्‍यता आहे. मुंबईत आज शिवाजी पार्क परीसरात सर्वाधिक 33.33 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला असून इतर ठिकाणी हलक्‍या सरी कोसळल्या.तर,आता मान्सुनचा परतीचा प्रवासही पुढल्या आठवड्या पासून सुरु होण्याची शक्‍यता आहे.

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत सावळा गोंधळ; राज्याची घोषणा, रेल्वेचा मात्र नकार 

मध्य भारतातून मान्सुनचा परतीचा प्रवास सुरु असतानाच बंगलच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टी निर्माण झाल्यामुळे हा प्रवास अडकला होता.या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तेलंगणामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन विनाशकारी पाऊस झाला होता.हे क्षेत्र मध्य महाराष्टातून कोकणाकडे सरकत असताना राज्यातही तुफान पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र,हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात सरकले असून ते किनाऱ्यापासून दुर जात आहे.अशी माहिती मुंबई वेधशाळेकडून देण्यात आले.यामुळे मुंबईसह कोकणातील पावसाचा जोर ओसरणार आहे.पुढील मंगळवार पर्यंत मुंबईसह मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्‍यता आहे.या पावसामुळे मुंबईतील तापमानतही घट झाली होती.मुंबईत आज संध्याकाळ पर्यंत कुलाबा येथे कमाल 31.8 आणि किमान 25 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.तर,सांताक्रुझ येथे 32.6 आणि किमान 24.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.पुढील दोन दिवस तापमान याच पातळीवर राहाण्याची शक्‍यता आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 1,823 कोरोना रुग्णांची वाढ; तर रुग्ण दुपटीचा दर 82 दिवसांवर 

मुंबईत 28 सप्टेंबर पर्यंत मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो.मात्र,यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने 9 ऑक्‍टोबर पासून मान्सुन परतण्यास सुरवात होणार होती.त्याच काळात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सुनचा परतीचा प्रवास रखडला होता.तो प्रवास 23 ऑक्‍टोबर नंतर मध्य भारतातून सुरु होण्याची शक्‍यता आहे.

-----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )