

mumbai traffic congestion latest news
esakal
Mumbai Thane Road Project : मुंबई आणि ठाणे या दोन शहरांदरम्यानचा प्रवास म्हणजे वाहतूक कोंडीचा मोठा अडथळा, अशी सर्वसाधारण भावना आहे. सध्या दीड ते दोन तास लागणारा हा प्रवास लवकरच अवघ्या २५ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोरेगाव–मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.