Mumbai News : वयाची ७० ओलांडली, 15 वर्षे तुरुंगात ; अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची कोर्टाकडे दयेची याचना

अरुण गवळीच्या याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने सरकारला नोटीस बजावली आहे.
Arun Gawli
Arun Gawlisakal

मुंबई : गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दयेची याचना केली आहे. अरुण गवळीने त्याच्या फुफ्फुस आणि पोटाशी संबंधित आजाराचा उल्लेख केला.अरुण गवळीच्या याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने सरकारला नोटीस बजावली आहे.

Arun Gawli
Mumbai Crime : दारासमोर चप्पल ठेवल्याच्या रागातून वाद; जोडप्याने केली शेजारच्याच हत्या

हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दयेची याचना केली आहे.अरुण गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने २००६ साली जारी केलेल्या परिपत्रकाचा हवाला देत याचिका दाखल केली आहे.

20 जानेवारी 2006 च्या सरकारी अधिसूचनेनुसार, 14 वर्षांचा तुरुंगवास पूर्ण केल्यानंतर तो मुक्त होण्यास पात्र आहे.ज्यामध्ये चौदा वर्षे तुरुंगवास भोगलेल्या आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या दोषींची तुरुंगातून सुटका होऊ शकते.

न्यायालय काय म्हणते गवळीच्या याचिकेत

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी मे 2008 पासून तुरुंगात त्याने कोर्टात याचिका दाखल केली आहे की तो आता 70 वर्षांचा आहे. सन 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक जारी केले होते. त्याचाच संदर्भ घेत 20 जानेवारी 2006 च्या सरकारी अधिसूचनेनुसार, 14 वर्षे तुरुंगवास पूर्ण केल्यानंतर तो मुक्त होण्यास पात्र आहे, कारण त्याने वयाची 65 वर्षे पूर्ण केली आहेत आणि त्याला दीर्घकालीन आरोग्य समस्या आहेत.

Arun Gawli
Mumbai Fire News : गोरेगाव फिल्मसिटीत TV मालिकेच्या सेटला भीषण आग! काही कलाकार अडकल्याची भीती

महाराष्ट्र शासनाच्या 2015 च्या परिपत्रकाचाही रिट याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगारांना याचा अधिकार नाही आणि त्यांना 2006 च्या अधिसूचनेतून सूट देण्यात आली आहे.

गवळी यांनी महाराष्ट्र कारागृह (शिक्षेचे पुनरावलोकन) नियम, 1972 च्या नियम 6 मधील उप-नियम (4)आव्हान दिले आहे, जे 1 डिसेंबर 2015 च्या अधिसूचनेद्वारे जोडले गेले होते. MCOCA कायद्यांतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तींना अधिसूचनेचा लाभ घेण्यासाठी 20 जानेवारी 2006 रोजी त्यातील नियम 6 मध्ये सुधारणा करण्यात आली. रिट याचिकेत नमूद केले आहे की गवळीला 2012 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते, त्यामुळे 2015 ची अधिसूचना त्याला लागू होत नाही.

रिट याचिकेत गवळीने आपल्या फुफ्फुस आणि पोटाशी संबंधित आजारा बाबत शिक्षा माफ करण्याची विनंती केली आहे. अरुण गवळी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली असून त्यांना १५ मार्चपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे.

Arun Gawli
Mumbai Crime News : 'त्या' सहा तासात नेमकं घडलं काय? घाटकोपरच्या जोडप्याच्या मृत्यूमागील गूढ वाढलं

काय आहे संपूर्ण प्रकरण...

2007 मध्ये शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्यावर विजय गिरी नावाच्या व्यक्तीने साकीनाका, अंधेरी येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडल्या होत्या. जामसंडेकर यांच्या शत्रूंनी ३० लाख रुपयांची सुपारी दिलेल्या अरुण गवळीच्या सांगण्यावरून जामसंडेकर यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. वास्तविक, जामसंडेकर आणि आरोपींमध्ये जमिनीच्या व्यवहारावरून वाद झाला होता.

गवळीला 2008 मध्ये अटक

अरुण गवळी यांना आमदार असताना मे 2008 मध्ये या प्रकरणी अटक करण्यात आली होती. यानंतर कनिष्ठ न्यायालयाने 2012 मध्ये त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयांचा आदेश कायम ठेवला.

अरुण गवळीची गोष्ट

मुंबई बॉम्बस्फोटानंतर सर्व बडे अंडरवर्ल्ड डॉन मुंबई सोडून गेले होते. आता गुन्हेगारीचे दोनच खेळाडू मैदानात होते. ते खेळाडू होते अरुण गवळी आणि अमर नाईक. मुंबईच्या गादीसाठी दोघांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले होते. अरुण गवळीचा शार्पशूटर रवींद्र सावंत याने 18 एप्रिल 1994 रोजी अमर नाईक यांचा भाऊ अश्विन नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला केला पण तो बचावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com