Vishakha Raut Corporator Post Cancelled
esakal
Vishakha Raut Corporator Post Cancelled: मुंबईत ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेनेत अनेक वर्षे काम केलेल्या आणि मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद रद्द करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर आता त्यांचं नगरसेवकपदही रद्द करण्यात आलं आहे.