Mumbai News : गणेश मूर्तींवर शिक्का मारण्याचा निर्णय रद्द; पालिकेने केले स्पष्ट

पर्यावरण पूरक गणेशमूर्तींच्या ओळखीसाठी ‘मार्क’ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता
municipal administration decided to mark Ganesha idols to identify them as eco-friendly cancelled
municipal administration decided to mark Ganesha idols to identify them as eco-friendly cancelledSakal

मुंबई - पर्यावरण पूरक गणेशमूर्तींच्या ओळखीसाठी ‘मार्क’ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आला असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. गणेश मूर्तींवर शिक्का मारला जाऊ नये, अशा सूचना प्रशासनामार्फत मूर्तीकारांना बैठकीत देण्यात आल्या होत्या, असे प्रशासनाने म्हटले आहे.

येत्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजण्यासाठी मुंबई महापालिकेकडून गणेशमूर्तींच्या ओळखीसाठी मार्क करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र गणेशोत्सव सणासाठी प्रशासनामार्फत आयोजित समन्वय बैठकीत गणेश मूर्तींवर शिक्का मारला जाऊ नये, अशा सूचना प्रशासनामार्फत मूर्तीकारांना त्यावेळीच देण्यात आल्या होत्या, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मूर्तीकारांनीही या सुचनेचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

निर्णय रद्द झाल्याची माहिती समितीला दिलेली नाही -

पर्यावरण पूरक गणेशमूर्तींच्या ओळखीसाठी ‘मार्क’ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र या निर्णयाला मंडळांचा विरोध होता. आता पालिकेने हा निर्णय रद्द केला असेल तर त्याची माहिती मंडळांच्या समन्वय समितीला देणे आवश्यक होते. तसे परिपत्रक काढायला हवे होते. तसे न झाल्याने मंडळांमध्ये संभ्रमावस्था आहे.

-अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com