

MNS And BMC Action On White Line
ESakal
मुंबई : दादर भागात धार्मिक परंपरेच्या नावाखाली सार्वजनिक रस्त्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) 'मनसेस्टाईल ने आपल्या खास हाणून पाडला आहे. जैन समाजाच्या कार्यक्रमासाठी रस्त्यावर आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी थेट पालिका प्रशासनाला ३ वाजेपर्यंतचा 'अल्टिमेटम' दिला होता. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे घाबरलेल्या पालिका प्रशासनाने अखेर वेळेच्या आत धावपळ करीत ही पांढरी पट्टी रस्त्यावरून पुसून टाकली. यामुळे दादरमधील संभाव्य बाद टळला असला तरी याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.