महापालिका निवडणुका  "आप' स्वबळावर लढणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

मुंबई : मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक आम्ही कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लढविणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी मुंबई येथे दिली. पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सुरू झाले असून येत्या तीन महिन्यांत त्याची प्रचीती येईल, असेही सिंह म्हणाले.

'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या...

मुंबई : मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक आम्ही कोणत्याही पक्षाशी आघाडी न करता स्वबळावर लढविणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी शुक्रवारी मुंबई येथे दिली. पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सुरू झाले असून येत्या तीन महिन्यांत त्याची प्रचीती येईल, असेही सिंह म्हणाले.

'शेठ' आले क्रिकेटच्या मैदानात आणि चालवल्याना चार गोळ्या...

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने दणदणीत विजय मिळवला. या पार्श्‍वभूमीवर संजय सिंह यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. निवडणूक लढवताना आप कोणत्याही पक्षाशी आघाडी करणार नाही. पक्ष मजबूत करून आम्ही निवडणूक लढवू. जेथे संघटन मजबूत आहे तेथे निवडणूक लढण्याबाबत पक्ष निर्णय घेईल, असे सिंह म्हणाले. राष्ट्रीयस्तरावर "आप' हा भाजपला पर्याय आहे की नाही याचा निर्णय देशातील जनता करेल. मात्र, तूर्तास आम्हाला पर्याय निर्माण करण्यासाठी संघटन बळकट करण्याची गरज आहे. कारण सध्या पक्षाचे संघटन मजबूत नाही.

९० रुपयात विकला जाणाऱ्या मृत्यूला आहे तिथे गाडा...

पाच दिवसांत 13 लाख सदस्यांची नोंदणी 
संघटन नसताना निवडणूक लढवणे ही केवळ औपचारिता ठरेल. त्यामुळे दिल्लीतील विकासाचे मॉडेल घेऊन आम्ही देशभर जाणार आहोत. राष्ट्रनिर्माणाच्या कामात लोकांनी "आप'सोबत यावे म्हणून आम्ही अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही गेल्या पाच दिवसांत 13 लाख सदस्यांची नोंदणी केल्याचे सिंह यांनी सांगितले.

म्हणाली बाजारातून कपडे खरेदी करून येते आणि सासऱ्यांच्या शेतातील झोपडीत...

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला 100 युनिटपर्यंतची वीज मोफत द्यायची असेल, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यासाठी सहकार्य करण्यास तयार आहेत. जितके मोठे राज्य तितके महसुलाचे स्रोत अधिक असतात. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांनी 100 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांना मोफत वीज दिली पाहिजे. 
- संजय सिंह,
खासदार, आम आदमी पक्ष

Municipal Elections will contest "AAP" on its own


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Elections will contest "AAP" on its own