
MVA Meeting: महाविकास आघाडीची काही वेळात बैठक! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा
मुंबई : महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील प्रमुख नेत्यांची दुपारी बैठक बोलवण्यात आली आहे. यावेळी सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि आगामी सभांबाबत चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. (MVA Meeting today Discussions will be held on some important issues)
अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव येणार आहे. यामध्ये विरोधकांकडून कुठल्या मुद्द्यांवर भाषण करणं अपेक्षित आहे याबाबत दुपारी बारा वाजता होणाऱ्या या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच येत्या काळात महाविकास आघाडीच्या काही सभा देखील पार पडणार आहेत. एप्रिल महिन्यात या सभा होणार आहेत, या सभांची रणनीती काय असेल याबाबतही या बैठकीच चर्चा होणार असल्याचं सूत्रांकडून कळते आहे.
मविआच्या या बैठकीला शिवसेना नेते उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील तर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत.