पक्षविरोधात वर्तमानपत्राची भूमिका कशासाठी ? नाणारकर सामना ऑफिसमध्ये..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

मुंबई - भाजप आणि शिवसेनेचं सरकार असताना शिवसेनेने उघडपणे नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्राच्या रत्नागिरी आवृत्तीमध्ये नाणार रिफायनरीची जाहिरात आल्याने मोठ्या वादाला सुरवात झालीये.  

शिवसेनेचं मुखपत्र सामनामध्ये नाणार रिफायनरीची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने नाणारवासीय  संतप्त झालेत. यानंतर त्यांनी थेट सामनाचं ऑफिस गाठलंय. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका नेमकी काय? याबद्दल नाणारवासीयांनी थेट सामना ऑफिसमध्ये जाऊन  संजय राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.  

मोठी बातमी कोरेगाव भीमा प्रकरणी राज्य सरकारही SIT नेमणार, गृहमंत्र्यांचे स्पष्ट संकेत...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम नाणारमधल्या नागरिकांना साथ दिली आहे. कायम शिवसेसेनेचे नेते, आमदार, खासदार हे नाणार विरोधी भूमिका घेतात. अशात आज छापून आलेल्या जाहिरातीमुळे नाणारवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

शिवसेनेची याबाबत नेमकी भूमिका काय? याची विचारपूस करण्यासाठी धास्तावलेले नाणारवासीय मुंबईतील सामना ऑफिसमध्ये धडकलेत. ज्या पक्षाची भूमिका नाणार विरोधी आहे, अशाच पक्षाच्या मुखपत्रात नाणार रिफायनरीची जाहिरात कशी येऊ शकते? असा सवाल आता विचारला जातोय.

नाणार रिफायनरी पुन्हा येणार किंवा रत्नागिरीत दुसरीकडे कुठे सुरु होणार तर नाहीना? याची विचारपूर नाणारवासीय करतायत. पक्षाच्या विरोधात वर्तमानपत्र का गेलं, याची विचारपूस देखील त्यांनी केलीये.

मोठी बातमी बापरे ! ...म्हणून प्रदीपने अंजनाच्या डोक्यात घातला गॅस सिलिंडर

दरम्यान उद्याच्या वर्तमानपत्रात याबद्दल काही खुलासा आला नाही तर नाणारवासीय उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.       

nanar refinery add in samana paper citizens of nanar reached samana office 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nanar refinery add in samana paper citizens of nanar reached samana office