
मध्य रेल्वेच्या मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान ट्रेनमधून रुळावर पडल्यानं ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सीएसएमटीहून सुटलेली पुष्पक एक्सप्रेस आणि मुंबई लोकल एकमेकांना घासल्यानं ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. रेल्वे प्रशासनाकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. अद्याप या घटनेमागचं कारण समजू शकलं नसल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलंय. या दुर्घटनेवर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देताना नेमकं काय घडलं हे समोर येणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. नियोजनात चूक झाली की आणखी काय घडलं हे पहावं लागेल असं ते म्हणाले. तसंच प्रवाशांचीही जबाबदारी असते असंही म्हस्के म्हणालेत.