अजित डोवाल मुंबईत; शिंदे फडणवीसांसह राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चेत!

डोवाल यांच्या या भेटीचा आगामी मुंबई महानगरपालिकेशी संबंध जोडला जात आहे.
Ajit Doval Bhagatsingh Koshyari
Ajit Doval Bhagatsingh KoshyariSakal

गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा विविध नेत्यांच्या गाठीभेटी होत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ सप्टेंबर रोजी मुंबईत लालबागचा राजाच्या दर्शनाला येणार आहेत. तर आता देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील मुंबईत आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली आहे.

Ajit Doval Bhagatsingh Koshyari
Ambani: अनंत अंबानींना कोरोनाची लागण; कालच शिंदे- फडणवीसांनी घेतली होती भेट

अजित डोवाल यांनी राज्यपालांची भेट घेतल्याने आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय मंत्र्यांचे मुंबई दौरे सुरूच आहेत. मुंबईवर भाजपाचं विशेष लक्ष असून ते मुंबईसाठी बरेच प्रयत्न करत आहेत. त्याच प्रयत्नांचा हा एक भाग असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

Ajit Doval Bhagatsingh Koshyari
'बाळासाहेबांचे वारसदार'; शिंदे-ठाकरे भेटीनंतर 'श्रीगणेशा' म्हणत मनसेचं ट्विट चर्चेत

दरम्यान, अजित डोवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन तिथल्या गणपतीचं दर्शनही घेतलं आहे. त्यानंतर आता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com