'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त भरणार 'निसर्ग शाळा'

याअंतर्गत पर्यटकांना राष्ट्रीय उद्यानात भटकंती करण्यासोबतच निसर्ग माहिती अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
National park mumbai
National park mumbaigoogle

मुंबई : शाश्वत पर्यटन आणि निसर्ग संवर्धन यांबाबत जनजागृती घडवण्याच्या उद्देशाने 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'ने 'निसर्ग शाळा उपक्रम' हाती हाती घेतला आहे. याअंतर्गत पर्यटकांना राष्ट्रीय उद्यानात भटकंती करण्यासोबतच निसर्ग माहिती अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

National park mumbai
'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'संदर्भात CM ठाकरेंनी दिले महत्त्वाचे निर्देश

'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त विविध प्रकारची झाडे, प्राणी, पक्षी आणि कीटक आढळतात. ते पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. यासाठी वर्षभर उद्यानातर्फे विविध सहलींचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून येत्या महाराष्ट्र दिनी निसर्ग शाळा उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे.

National park mumbai
राष्ट्रीय एकात्मता उद्यान देशभक्तीची प्रेरणा देईल-PNE21R0339

विविध आकर्षणांना भेट देत उद्यान पाहण्याची आणि सखोल माहिती जाणून घेण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने पर्यटकांना मिळणार आहे. दर शनिवारी आणि रविवारी या सहली आयोजित केल्या जातील. सकाळी ७ ते ९ या वेळेत 'शिलोंडा सहल' आयोजित केली जाईल. त्यानंतर ९.३० ते १०.३० या वेळेत 'निसर्ग माहिती केंद्र' येथे माहितीपट दाखवला जाईल व निसर्ग माहिती अधिकारी संवाद साधतील. त्यानंतर फुलपाखरू उद्यानात भ्रमंती केली जाईल.

National park mumbai
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; वर्षा येथे झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रतिव्यक्ती ५०० रुपये शुल्क आहे. १२ वर्षांखालील मुलांसाठी २०० रुपये शुल्क आहे. ४ वर्षांखालील मुलांसाठी हा उपक्रम मोफत आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क - ८४५०९५८७४१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com