

Navi Mumbai Pedestrian Bridge Project
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या वाशी-कोपरखैरणे रस्त्यावरील गुलाबचंद डेअरी परिसरात महानगरपालिकेने पादचाऱ्यांसाठी पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरखैरणे येथील डी-मार्ट चौक ते तीन टँकीपर्यंतचा रस्ता मोठ्या संख्येने लोक रस्ता ओलांडत असल्याने सतत जाम होतो. आता अनेक वर्षांनंतर या प्रस्तावामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.