सहकार्य मिळेना! ... ती म्हणते 'एकला चलो रे!'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, शहर स्वच्छ करताना इतर प्राधिकरणांकडून स्वच्छता अभियानाच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पालिकेने "एकला चलो रे'चा नारा देत शहरातील स्वच्छतेची जबाबदारी उचलली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिल्या तीन क्रमांकामध्ये येण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, शहर स्वच्छ करताना इतर प्राधिकरणांकडून स्वच्छता अभियानाच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पालिकेने "एकला चलो रे'चा नारा देत शहरातील स्वच्छतेची जबाबदारी उचलली आहे. एमआयडीसी, सिडको, एपीएमसी, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन पालिकेला सहकार्य करत नसल्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

ही बातमी वाचली का? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुलांना सांगितलं, तुम्ही...

नवी मुंबई शहर हे एमआयडीसी, सिडको व पालिका या तीन प्राधिकरणांवर उभे आहे. मात्र, सिडको व एमआयडीसी प्रशासन हे शहर स्वच्छतेची जबाबदारी पालिकेची असल्याने, त्यांच्या स्वच्छता अभियानाशी काहीएक संबंध नसल्यासारखी करत आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सकाळी 5 वाजल्यापासूनच पालिकेचे कर्मचारी हे स्वच्छतेसाठी प्रभागात फिरून स्वच्छता करून घेत आहेत. पालिकेच्या कर्मचारी विभागाकडून सिडको, एमआयडीसी, रेल्वे, एपीएमसी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते या क्षेत्रामध्ये स्वच्छता; तसेच शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी सकाळपासूनच आयुक्तांसह अन्य पालिका अधिकारी-कर्मचारी हे पाहणी दौरे करत आहेत. मात्र, एमआयडीसी व सिडको प्रशासनाकडून हात वरती केले जात आहेत. एमआयडीसी, सिडकोकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता ठेवली जात नसल्याने, ती जबाबदारीदेखील पालिकेलाच उचलावी लागत आहे. त्यामुळे पालिका कर्मचारी हवालदिल झाले आहेत; तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला एमआयडीसी व सिडको प्रशासनांचे कर्मचारी येत नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

ही बातमी वाचली का? 'या' जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फरपट..​

प्राधिकरणांकडून टोलवाटोलवी! 
एमआयडीसी विभागात स्वच्छता ठेवण्याचे काम हे नवी मुंबई महापालिकेचे आहे. एमआयडीसी प्रशासनाने पालिकेकडे स्वच्छतेसाठी सर्व परिसर हस्तांतरित केला आहे. तरीदेखील एमआयडीसी प्रशासनाकडून स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये पालिकेला सहकार्य करण्यात येत आहे, असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. सिडकोचे जनसंपर्क व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा व जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

पालिका ही स्वच्छ सर्वेक्षणामध्ये काम करत आहे; मात्र सिडको, महावितरण, एमआयडीसी प्रशासनानेही सहकार्य करावे, यासाठी त्यांच्यासोबत पत्रव्यव्हार केला आहे. मात्र, या प्रशासनाकडून सहकार्य मिळालेले नाही. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नंबर मिळाल्यास शहरासोबतच प्रशासनाचेदेखील नाव उंचावले जाणार आहे. 
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, महापालिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navi Mumbai Municipality alone in swachhata mission