Navi Mumbai: भाजपकडून शिंदेंना वारंवार डावललं जातंय? कार्यक्रमपत्रिकेतून नाव गायब; शिंदेसेनेने दाखवले काळे झेंडे

NMMC Controversy : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेत एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यामुळे शिंदेसेनेकडून काळे झेंडे दाखवत आंदोलन करण्यात आले.
NMMC Shinde Shivsena Protest

NMMC Shinde Shivsena Protest

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेत नसल्यामुळे शिंदेसेना आक्रमक झाली आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांचे नाव सातत्याने डावललं जात असल्यामुळे शिंदे शिवसेनेच्या वतीने नवी मुंबईत आंदोलन केलं आहे. यावेळी शिंदेसेनेकडून काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com