

Ajit Pawar group leader joined Shinde Shivsena
ESakal
वाशी : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्याचे आवाहन केले असले तरी नवी मुंबईतील भाजप-शिवसेना युतीबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील युतीचा निर्णय गुलदस्त्यातच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.