esakal | नवी मुंबईत अजित पवार आक्रमक, कार्यकर्त्यांना म्हणालेत..
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत अजित पवार आक्रमक, कार्यकर्त्यांना म्हणालेत..

नवी मुंबईत अजित पवार आक्रमक, कार्यकर्त्यांना म्हणालेत..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - नवी मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झालीये. नवी मुंबईतील वातावरण आता या निवडणुकांमुळे तापलेलं पाहायला मिळतंय. एकीकडे राष्ट्रवादीतून भाजपात आलेले गणेश नाईक यांच्याकडे महापालिका राखण्याचं आव्हान आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई महापालिका महाविकास आघाडीकडे नेण्याचा विडा खुद्द अजित पवारांनी उचलला आहे. याचीच तयारी म्हणून अजित पवार यांनी नवी मुंबईतील वाशीत महाविकास आघाडीचा मेळावा घेतला. यामध्ये अजित पवार यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.  

मोठी बातमी - नवी मुंबई राखण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन... 

आक्रमक अजित पवार : 

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळालेत. 'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात' असं म्हणत अजित पवार हे निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी किती आक्रमक आहे हे दाखवून दिलंय. 

येत्या निवडणुकांनंतर नवी मुंबईत कुणीतरी महापौर होईल, कुणीतरी स्थायी समिती अध्यक्ष होतील तर कुणीतरी सभापतीही होईल, मात्र नाईक कुटुंबातील यापैकी कुणीही होणार नाही असंही अजित पवार म्हणालेत.

मोठी बातमी - शिवसेनेच्या वाघाने फाडले आशिष शेलारांचे कपडे, मुंबईत बॅनरबाजी..

नवी मुंबईत येत्या काळात एकाधिकारशाही खपवून घ्यायची नाही असं अजित पवारांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगितलंय.

दरम्यान संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी अजित पवार प्लॅनिंग करताना पाहायला मिळतायत. ज्यांना नगरसेवकपद मिळणार नाही त्यांनी चिंता करू नका, त्यांना जिल्हा समित्यांवर आणि महामंडळांवर घेणार असल्याचं अजित पवार म्हणालेत.

मोठी बातमी - "राष्ट्रवादीची सत्ता आहे.. मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे!"

अजित पवार यांचं सगळं धडाकेबाज असतं

या मेळाव्यात अजित पवार यांच्यासोबत काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. महाविकास आघडी सत्तेत असताना भाजप सत्तेत येणार नाही असा विश्वास अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवला. "आम्ही शांततेत कारभार करतो, अजित पवार यांचं सगळं धडाकेबाज असतं" असंही अशोक चव्हाण म्हणालेत.  

दरम्यान महाविकास आघाडीकडून घेण्यात आलेल्या मेळाव्यानंतर भाजपकडून देखील महापालिका निवडणुकांसाठी प्लॅनिंग केलं जातंय. एकंदरीतच नवी मुंबई महानगर पालिकेची यंदाची निवडणूक गाजणार यात काही शंका नाही.  

NCP leader ajit pawars aggressive moves before navi mumbai municipal corporation