

Maharashtra Deputy CM decision latest news
esakal
Maharashtra Politics Latest Update : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे जवळपास तासभर चाललेल्या चर्चेनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री पदाबाबतची भूमिका स्पष्ट केली.