

वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रसूतीत बालकाचा मृत्यू
esakal
Absence Medical Officer : आदिवासी भागातील हृदयद्रावक घटना वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रसूतीदरम्यान बालकाचा मृत्यू. आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह. : ऐन दिवाळीत मोखाडा ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीमुळे एका आदिवासी कुटुंबाला नवजात बाळ गमवावे लागल्याची घटना घडली आहे. खोडाळा येथील वैशाली अशोक बात्रे यांना बुधवारी (ता. २२) सकाळी प्रसूतीसाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र रुग्णालयात प्रसूतीदरम्यान संबंधित वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. केवळ एका परिचारिकेच्या भरवशावर बात्रे यांना १२ तास ठेवण्यात आले.