मुंबईभोवती कोरोनाचा विळखा अधिक घट्ट; आज 'इतके' नवे रुग्ण..जाणून घ्या आकडेवारी

corona
corona

मुंबई : मुंबईत आज 1311 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे  एकूण रुग्णसंख्या 84,125 झाली आहे. तर आज 69 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 4,896 वर पोचला आहे. मात्र मुंबईत आज एका दिवसात 2420 रुग्ण बरे होऊन घरी गेले.  

मुंबईत आज नोंद झालेल्या 69 मृत्यूंपैकी 61 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 42 पुरुष तर 27 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या रुग्णांपैकी चौघांचे वय 40 चयाखाली होतेे. तर 43 रुग्ण 60 वर्षा वरील होते तर 22 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते.                          

संशयित रुग्ण आढळणे सुरूच असून आज एकूण 932 नवे संशयित रुग्ण सापडले असून  आतापर्यंत 58,419 संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज 2,420 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत  55,883 रुग्णांना घरी सोडण्यात आले.  

 हेही वाचा: मुंबईत पावसाची हॅट्रीक; सलग तीसऱ्या दिवशीही मुंबईची झाली तुंबई..                                              
मुंबईत आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा दर हा 66 टक्के इतका आहे. तर 4 जून पर्यंत एकूूूण 3,54,649 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 28 जून ते 4 जुलै दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर हा 1.63 इतका आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा 43 दिवसांवर गेला आहे.

new 1311 corona patients in mumbai 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com