मुंबईत पावसाची हॅट्रीक; सलग तीसऱ्या दिवशीही मुंबईची झाली तुंबई.. 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

शुक्रवार पासून सुरु असलेला पावसाने रविवार संध्याकाळ नंतर उसंत घेतली आहे.तीन दिवस धुवाधार पाऊस कोसळल्याने सलग तीन दिवस मुंबईतील अनेक भागात पाणी तुबंले.

मुंबई: शुक्रवार पासून सुरु असलेला पावसाने रविवार संध्याकाळ नंतर उसंत घेतली आहे.तीन दिवस धुवाधार पाऊस कोसळल्याने सलग तीन दिवस मुंबईतील अनेक भागात पाणी तुबंले.

रविवारी पश्‍चिम उपनगरात पावसाचा जोर चांगला असल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते.यात,खार  निर्मल नगर येथील एका जिर्ण इमारतीचा मोठा भाग कोसळला असून यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.दिवसभरात 75 झाडे पडली.

हेही वाचा: "मै लष्कर ए तोयबा से सुलतान बोल रहा हूँ"; ताज हॉटेलला आले धमकीचे २ फोन..पोलिसांनी केला गुन्हा दाखल..

मुंबई,रायगड,ठाणे,पालघर जिल्ह्यात उद्या काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत आज संध्याकाळी 6 वाजे पर्यंत 24 तासात कुलाबा येथे 129.6 मि.मी आणि सांताक्रुझ येथे 200.8 मि.मी पाऊस नोंदविण्यात आला आहे.उपनगरांमध्ये पावसाचा जोर चांगला असल्याने वांद्रे अंधेरी,मालाड दहिसर या भागात पाणी साचले होते.तर,पुर्व उपनगरात विक्रोळी कन्नमवार नगर,चेंबूर या भागात पाणी साचले होते.

शहर विभागातील हिंदमाता,किंग्जसर्कल,भायखळा पोलिस ठाण्याचा परीसर सकाळीच पाण्याखाली गेला होता.अनेक भागात पाणी तुंबल्याने शिव रोड नंतर 24,हिंदमाता,शिवडी,नॅशनल कॉलेज वांद्रे या भागातील वाहतुक वळविण्यात आली होती.खार पुर्व येथील जे.पी मार्गावरील निर्मल  नगर येथील 8 क्रमांकाच्या इमारतीचा काही भाग आज सकाळी कोसळला.

सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.जिर्ण झालेल्या या इमारतीतील 39 खोल्या रिकाम्या होत्या.फक्त एक कुटूंब इमारतीत राहात होते.त्यांनही इमारतीचा भाग कोसळल्यानंतर घर सोडले.त्याच बरोबर शहर विभागात 1,पुर्व उपनगरात 1 आणि पश्‍चिम उपनगरात 2 ठिकाणी घरांची किरकोळ पडझड झाली.तर,दिवसभरात 75 झाडे पडली आहेत.

हेही वाचा: INSIDE STORY: यंदाच्या गणेशोत्सवाला कोरोनाचा प्रचंड फटका; मंडळांच्या अर्थचक्राला यावर्षी लागणार ब्रेक..नक्की वाचा

 

सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत झालेला पाऊस:

-शहर - 26.73 मि.मी
-पूर्व उपनगर - 76.39 मि.मी
-पश्‍चिम उपनगर - 62.84 मि.मी 

water filled in mumbai streets rain last from 3 days 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water filled in mumbai streets rain last from 3 days