
BMC Election: राज्यात सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. राज्यातील भाजपप्रणित महायुती सरकारनं राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आडून राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा घाट घातला आहे. याला राज्यातील विविध राजकीय पक्षांनी तसंच शिक्षणतज्ज्ञांनी कडाडून विरोध केला आहे.
राजकारणासाठी मुलांचा बळी दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तसंच सरकार मराठी भाषेच्या मुळावर उठल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. हा विषय आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा मुद्दा असणार आहे. त्यामुळं या वादात आता हिंदी भाषिकांच्या संघटनेनं उडी घेतली आहे. तसंच मुंबईवर उत्तर भारतीय महापौर बसेल अशी दर्पोक्ती केली आहे.