esakal | नव उद्योजकांनी बॅंकिंग, सरकार, निधी, धोरण समजून घेणं गरजेचं - चंद्रकांत साळुंखे
sakal

बोलून बातमी शोधा

नव उद्योजकांनी बॅंकिंग, सरकार, निधी, धोरण समजून घेणं गरजेचं - चंद्रकांत साळुंखे

शिखर परिषदेला राज्यभरातल्या महिला उद्योजिकांचा जबरदस्त प्रतिसाद 

नव उद्योजकांनी बॅंकिंग, सरकार, निधी, धोरण समजून घेणं गरजेचं - चंद्रकांत साळुंखे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सर्वसामान्य उद्योजकांना येणाऱ्या अडीअडचणी आणि समस्या याविषयी व्यासपीठाच्या माध्यमातून चर्चा केली जाते. तसेच नवउद्योजकांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं ज्ञान मिळावं, सध्या देशात कुठे व्यवसायासाठी संधी आहे, तिथं कसा व्यवसाय करता येईल, याविषयी त्यांचं मतं "महाराष्ट्र इंडस्ट्रियल ऍण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन' आणि "एसएमई चेंबर ऑफ इंडिया'चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी व्यक्त केलं. विलेपार्ले येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये महिला उद्योजक शिखर परिषदेत ते बोलत होते.

महत्त्वाची बातमी :  मुंबईतील रेल्वे स्थानकात घुसले विषारी साप आणि...

शिखर परिषदेला राज्यभरातल्या महिला उद्योजिका उपस्थित होत्या. ही शिखर परिषद "वूमन इंटरप्रेनिअस डेव्हलपमेंट काऊन्सिल' आणि "एसएमई चेंबर ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. बॅंकिंग, सरकार, निधी, धोरण इत्यादी गोष्टी उद्योजकांना माहीत नसतात. त्या माहिती व्हाव्यात यासाठी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, असंही चंद्रकांत साळुंखे म्हणाले. 

महत्त्वाची बातमी :  लोकांना ढगात पाठवणारा गांजा जातोय अंतराळ यात्रेला

"आजचा दिवस खरं तर खूप चांगला आहे; कारण आज स्वत:कडे हिंमत असलेल्या आणि विचारांनी सक्षम झालेल्या महिला इथे उपस्थित आहेत. उपस्थित महिलांमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या महिला आहेत. त्यानंतर अशा अनेक महिला आहेत; ज्या छोटा-मोठा व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या कल्पना इथे शेअर केल्या आहेत. आज त्या एकामेकींना स्वत:चं व्हिजीटिंग कार्ड शेअर करीत आहेत. त्या स्वत:ची ओळख एका वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम आमचं आहे. त्यामुळे मी त्यांना नेहमी मार्गदर्शन करीत राहीन'', असं प्रतिपादन रिझवी एज्युकेशन सोसायटी, रिझवी बिल्डर्सच्या संचालिका रुबिना रिझवी यांनी कार्यक्रमामध्ये केलं. 

महत्त्वाची बातमी :  नवी मुंबई शहरातून 'का' होतायत मोलकरणी गायब ?  

"ग्रामीण भागातल्या महिलांना खूप अडीअडचणी असतात. कुठे गुंतवणूक करायची म्हटलं, तर त्यांना घरातून विरोध केला जातो. त्यातूनही होकार मिळालाच तर पुढची पायरी महिलांना माहिती नसते. अशा महिलांना आम्ही सगळ्या योजना आणि त्यांच्यातून होणारा फायदा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. गावकडच्या महिला चांगलं मार्केटिंग करतात; पण त्यांना माहीत नसतं, की याला मार्केटिंग म्हणतात'' अशी गावाकडची वेगवेगळी उत्तम उदाहरणं "गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑप.'च्या संचालिका राजश्री पाटील यांनी उद्योजक महिलांना दिली. 

महत्त्वाची बातमी : PUB G खेळा, पैसे कमवा, करिअर देखील घडवा.. कसं ? 

"काळाच्या ओघानुसार सगळ्या गोष्टीत बदल होत आहेत. आज स्वत:च्या पायावर उभ्या राहणाऱ्या महिला अधिक सक्षम आहेत. त्यापैकीच तुम्ही आहात. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सगळ्या महिला उद्योजकांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सगळ्या महिलांनी असंच सक्षम व्हायला हवं, असं मला वाटतं. महिलांनी स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम असायला हवं. त्यामुळे तुमचं ध्येय निश्‍चित होण्याची शक्‍यता अधिक असते. सध्या जग बदलतेय. त्यानुसार तुम्हीही बदलून डिजिटल काळात वावरायला हवं'", असं महिला आर्थिक महामंडळाच्या संचालिका श्रद्धा जोशी-शर्मा शिखर परिषदेत म्हणाल्या.  

WebTitle : new investors should understand banking government and funding policy