

BMC New Waste Management Rules
ESakal
मुंबई : मुंबई शहरातील वाढत्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या आणि स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने, बीएमसीने कचरा व्यवस्थापनाचे नियम अधिक कठोर करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. नवीन तरतुदींनुसार, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या निवासी सोसायट्या, संस्था आणि आस्थापनांना आता कचऱ्याचे चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण करणे बंधनकारक असेल.