
New Year 2025 Marathi News : नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबई सज्ज झाली होती. लोकांनी एन्जॉय करावा पण नियमांच्या चौकटीतून राहून ही अटही त्यासाठी लागू होती. जर या अटींचा किंवा नियमांचा भंग झाला तर त्याची सजाही भोगायला तयार राहा असा पवित्रा मुंबई पोलिसांनी घेतला होता. त्यानुसार पोलिसांनी तब्बल ९० लाखांचा दंड चलानद्वारे वसूल केला आहे.