औषधाप्रमाणे नारळावरही एक्‍स्पायरी डेट! पण कशाला ?

औषधाप्रमाणे नारळावरही एक्‍स्पायरी डेट! पण कशाला ?

मुंबई -  कोणतीही वस्तू खरेदी करताना खबरदारी म्हणून आपण त्याची एक्‍स्पायरी डेट आवर्जून पाहतो; मात्र आता विक्रीसाठी येणाऱ्या नारळावरही एक्‍स्पायरी डेट लिहिली जात असल्याचे तुम्हाला सांगितल्यास खरे वाटेल का? प्रभादेवीत असे घडत आहे. येथील सान्वी स्टोअर्सचे विक्रेते नारळावर एक्‍स्पायरी डेट लिहूनच त्यांची विक्री करत आहेत. त्यामुळे परिसरात याविषयी सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

आतापर्यंत औषधे, मेकअप सामान, खाद्यपदार्थांवर असणाऱ्या एक्‍स्पायरी डेटची गरज नारळावर लिहिण्याची गरज या विक्रेत्यांना का पडली, याची कहाणीही तेवढीच रोचक आहे. काही फसवणूक करणाऱ्या ग्राहकांमुळे दुकानदारांनी हा निर्णय घेतला आहे. मोठ्या सुपरमार्केट किंवा किराणा मालाच्या दुकानातून नारळ खरेदी केल्यावर तो खराब निघाल्यास दुकानदार आपल्याला नारळ बदली करून देतो; मात्र अनेकदा ग्राहक हातगाडीवर कमी किमतीत नारळ मिळत असल्याने तेथून ते खरेदी करतात. हे नारळ खराब निघाल्यानंतर ग्राहक मात्र जवळील दुकानात जातात व ते बदलून देण्याचा आग्रह करतात.

नारळावर कोणतीही खूण खून नसल्याने दुकानदारांनाही हे नारळ आपल्याच दुकानातून विकत घेतले आहे का हे तपासता येत नाही. त्यामुळे नाइलाजाने त्यांना नारळ बदलून द्यावे लागतात. त्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होते. आपल्या दुकानातील नारळावर काही तरी खून असावी, या गरजेतूनच सान्वी स्टोर्सने आता नारळांवर एक्‍सपायरी डेट लिहिण्याचे ठरवले आहे व ते अमलातदेखील आणले आहे. परिसरातील इतर विक्रेतेही हा कित्ता गिरवण्याच्या मार्गावर आहेत. काहींनी आपल्या दुकानातील नारळावर विशिष्ट चिन्हे दिली आहेत; तर काहींनी दुकानाचे नाव व तारखेचा शिक्कादेखील मारला आहे. अशाप्रकारे प्रभादेवी, परळ परिसरातील नारळ विक्रेत्यांनी आपल्या नारळाची विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ग्राहकांनाही त्यांची फसवणूक आता करता येणार नाही. 

ग्राहकांना खराब नारळ मिळाल्यास आम्ही तो बदलून देतो; मात्र बऱ्याच वेळा ग्राहक इतर दुकानांतून नारळ खरेदी करतात व तो खराब निघाल्यानंतर आमच्याकडे येतात. ग्राहकांसोबत वाद होऊ नये म्हणून आम्हाला तो बदलून द्यावा लागतो. यावर तोडगा निघावा म्हणून आम्ही नारळावर एक्‍स्पायरी डेट लिहिण्याची संकल्पना सुरू केली आहे. एकदा आमच्या दुकानातून घेतलेला नारळ खराब निघाल्यास तीन दिवसांत ग्राहकाला तो बदलून दिला जाईल. - असित हुले, नारळ विक्रेते, सान्वी स्टोअर्स 

newest funda by one of the supermarkets in mumbai of mentioning expiry date on coconut 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com