कोरोनामुळे संकटात सापडलेल्या मुंबईतील रात्र शाळा पुन्हा झाल्या सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

कोरोनामुळे संकटात सापडलेल्या मुंबईतील रात्र शाळा पुन्हा झाल्या सुरू

मुंबई : कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईतील रात्रशाळा पुन्हा गजबजू लागल्या आहेत. दिवाळीच्या सुटीनंतर या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित राहत असून यामुळे शिक्षक वर्गांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या शाळांमध्ये येत असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात आहे.

मुंबई आणि परिसरात रात्र शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये यांची संख्या 130 हून अधिक आहे. यात 15 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. कोरोना आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा सर्वात मोठा फटका रात्र शाळाना बसला आहे. त्यामुळे या शाळा सुरू होण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चेंबूर नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष धावडे म्हणाले.

आता दिवाळीनंतर विद्यार्थ्यांची सध्या उपस्थिती कमी आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लस न घेतल्याने लोकल प्रवास करण्यास मुभा मिळत नाही. परिणामी दूरवरून येणारे विद्यार्थी रात्र शाळांमध्ये पोहोचत नाहीत तर दुसरीकडे काहींना रोजगार गेल्याने रात्र शाळांमध्ये येण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असल्याची माहिती माहिती सद्गुरु नाईट हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष राजाराम काळे यांनी दिली.

हेही वाचा: मुंबई : पॉस्को न्यायालयाचा निकाल ;आरोपीची मागणी फेटाळली

नोकरी, रोजगार करून आपले आपले कुटुंब सांभाळत शिक्षण पूर्ण करणाऱ्या आर्थिक आणि उपेक्षित घटकांसाठी रात्र शाळा आहे अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहेत. मात्र मागील काही वर्षात रात्र शाळांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी सरकारने नव्याने या शाळांसाठी विचार करावा अशी मागणी काळे यांनी केली.

राज्यात अशा आहेत रात्र शाळा..

राज्यात एकूण 175 हून अधिक रात्रशाळा कार्यरत आहेत. त्यापैकी सर्वाधिक अशा तब्बल 130 शाळा मुंबई परिसरात आहेत. या शाळांमध्ये मुंबईत 15 हजारहून अधिक विद्यार्थी आठवी ते बारावी आणि पुढे पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतात. यामध्ये मुंबईत 17 कनिष्ठ महाविद्यालय आणि 3 वरिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये विद्यार्थी आपल्या सवडीनुसार या रात्र शाळा आणि महाविद्यालयातून शिक्षण घेत असतात.

हेही वाचा: Corona Update : राज्यात 766 नवीन रुग्ण 19 रुग्णांचा मृत्यू

कोरोना काळानंतर रात्र शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गळती झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मुलांचा शोध घेऊन नव्याने या शाळा सुरळीत करण्यासाठी मासूम संस्थेने पुढाकार घेतला आहे. या शाळा सुरळीतपणे चालण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी आमचा यापुढे फोकस असणार आहे.

- निकिता केतकर, माजी सनदी अधिकारी व मासुमच्या कार्यकारी अधिकारी

loading image
go to top