मुंबईत नाईट लाईफ लवकरच पण, रात्री दिड नंतर मद्यपान बंदी!

मुंबईत नाईट लाईफ लवकरच पण, रात्री दिड नंतर मद्यपान बंदी!

मुंबई: नाईट लाईफचा पहिला टप्पा लवकरच सुरु होण्याची शक्‍यता आहे. या पहिल्या टप्प्यात मॉल्स तसेच मोठी करमणुक केंद्रातील उपहारगृह 24 तास सुरु राहाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, 0रात्री दिड वाजल्यानंतर मद्यपानाला परवानगी नसणार आहे. 

पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सह्याद्री या शासकीय विश्रामगृहावर हॉटेल व्यावसायिक, मॉल्सचे प्रतिनिधी तसेच पोलिस दलातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत नाईट लाईफचा आढावा घेतला. यात पहिल्या टप्प्यात मोठी करमणुक केंद्र तसेच मॉल्स खुले ठेवण्यासाठी राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन अनुकूल असल्याचे समजते. अशा मोठ्या ठिकाणी पोलिस सुरक्षा ठेवणेही शक्‍य असल्याने ही सुविधा तात्काळ सुरु करण्याची तयारी आदित्य ठाकरे यांनी दाखवली आहे. "राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय उल्लेखनिय असल्याचे हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी सांगितले. 

उपहारगृहा बरोबर बारही रात्रभर सुरु राहाणार आहे. मात्र, रात्री दिड वाजल्यानंतर मद्यपान करता येणार नाही. अशा अटीवरच ही परवानगी देण्यात येणार असल्याचे समजते. आदित्य ठाकरे यांनी पाच ते सहा वर्षांपुर्वी पहिल्यांदा नाईट लाईफची संकल्पना मांडली होती. नाईट लाईफच्या दुसऱ्या टप्प्यात फुड हब मध्ये उपहारगृह सुरु करण्याची परवानगी दिली जाण्याची शक्‍यता आहे. एकाच ठिकाणी पाच सहा उपहारगृह असलेल्या जागा ठरवून तेथील उपहारगृह 24 तास खुली करण्याची परवानगी देण्याचा विचार सुरु आहे. एकाच ठिकाणी सुरक्षा पुरवणे शक्‍य असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com