नितेश राणेंच्या जामीन अर्जावर हायकोर्टात १२ जानेवारीला पुन्हा सुनावणी

High Court Updates on Nitesh Rane Case
High Court Updates on Nitesh Rane CaseSakal
Summary

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश सीव्ही भडंग यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडली. या प्रकरणी पुढील सुनावणी १२ जानेवारी रोजी होणार आहे. सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्हा सत्र न्यायालयाने संतोष परब (Santosh Parab) मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणे यांचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्याविरोधात 03 जानेवारी 2022 रोजी आमदार नितेश राणे यांच्या वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.

नितेश राणें यांच्यावतीने ज्येष्ठ कायदेतञ् ऍड नितीन प्रधान व महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद केला. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे हेच या हल्यामागचे सूत्रधार राज्य सरकारच्या वतीने आरोप करण्यात आले. मागील सुनावणी दरम्यान आरोप सिद्ध करण्यासाठी आम्हाला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी द्या अशी मागणी राज्य सरकार तर्फे करण्यात आली होती. आता राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली.

High Court Updates on Nitesh Rane Case
भाजप नेत्यांवरील कारवाईनंतर चित्रा वाघ संतापल्या

आज नितेश राणें याचा वतीने ज्येष्ठ कायदेतञ् ऍड नितीन प्रधान प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागितली. त्यानंतर पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर अटकेची कारवाई करू नये असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 जानेवारीला पुन्हा होणार आहे. आज मुबंई उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com