आयुक्तांची वाशी रुग्णालयाला अचानक भेट; गैरकारभार चव्हाट्यावर आल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले.... 

सुजित गायकवाड 
Friday, 24 July 2020

नवी मुंबई शहरात जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा मार्च महिन्यात सर्वातआधी वाशीचे प्रथम संदर्भ रुग्णालयाला कोव्हिड-19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून तब्बल साडेचार महिने या रुग्णालयात शहरातील कोरोनाचे रुग्ण दाखल होत आहेत

नवी मुंबई : वाशीतील महापालिकेच्या विशेष कोव्हिड-19 रुग्णालयाचा कारभार अखेर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमोर चव्हाट्यावर आला. बांगर यांनी काल रात्री अचानक वाशी रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान दांडीबहाद्दर डॉक्टरांची फजिती झाली, तर रुग्णालयातील अस्वच्छतेचा भांडाफोड झाला. बांगर यांनी याबाबत सर्वांना कडक समज देऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

रुग्णालयात मामाऐवजी भाच्याने दिला मोबाईल क्रमांक; मग काय आरोग्यसेतू अॅपवर भाचाच झाला पॉझिटिव्ह...

नवी मुंबई शहरात जेव्हा कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा मार्च महिन्यात सर्वातआधी वाशीचे प्रथम संदर्भ रुग्णालयाला कोव्हिड-19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून तब्बल साडेचार महिने या रुग्णालयात शहरातील कोरोनाचे रुग्ण दाखल होत आहेत. इतर रुग्णालयांपेक्षा सर्वात जास्त डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि स्वच्छता कर्मचारी याच रुग्णालयात आहेत. तरी सुद्धा या रुग्णालयातून रुग्णांना चांगल्या उपचार, सुविधा आणि वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत होत्या. 

उत्पन्नप्राप्तीसाठी सरकारने आखली नवी योजना; त्यासाठी मुंबईतील 'या' जागेची झालीय निवड?​

काही डॉक्टर कामाची वेळ संपायच्या आधीच पळ काढत होते. तर काही निवासी डॉक्टर वेळेवर न येता आरामात येत आहेत. दरम्यानच्या काळात वाशी रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्ण रामभरोसे असतात. स्वच्छता कर्मचारीही एकदाच पीपीई कीट घालून स्वच्छता करून नंतर पळ काढतात. सकाळी स्वच्छता केली की पुन्हा कोणीच स्वच्छता कर्मचारी रुग्णांच्या वॉर्डात आणि स्वच्छतागृहात फिरकत सुद्धा नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण व त्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांना समस्या निर्माण होत आहेत. 

ती करत होती कोरोनासाठीच्या औषधांचं ब्लॅक मार्केटिंग, पोलिसांना समजलं आणि गेम ओव्हर...​

याबाबतच्या तक्रारी बांगर यांच्या कानावर पोहोचल्यानंतर बांगर यांनी काल रात्री वाशी रुग्णालयाला अचानक धडक दिली. रुग्णालयात जाताच बांगर यांना काही निवासी डॉक्टर आणि महापालिकेच्या आस्थापनेवर असणारे डॉक्टर अनुपस्थित असल्याचे दिसून आले. रुग्णालयातील रुग्ण कक्षेत आणि स्वच्छतागृहातील घाणेरडी अवस्था बांगर यांनी पाहीली. रुग्णालयात आवश्यक असणारा औषधांचा साठाही कमी असल्याचा बांगर यांच्या निदर्शनास आले. वाशी रुग्णालयात अचानक जाऊन पाहणी केल्यामुळे नजरेस पडलेल्या परिस्थितीवरून बांगर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांवर चांगलीच आगपाखड केल्याचे समजते. तसेच काही अनुपस्थित डॉक्टरांना कडक शब्दांत समज देत कठोर कारवाई करण्याचा इशारा बांगर यांनी दिला आहे.  

चक्क मुंबई पोलिसचं सांगताहेत नागरिकांना मास्क घालण्याची योग्य पद्धत

तुकाराम मुंढेंची आठवण 
नवे आयुक्त अभिजीत बांगर यांनी काल रात्री अचानक वाशीतील कोव्हीड-19 रुग्णालयाला दिलेल्या भेटीमुळे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईची काही क्षणांकरीता अधिकाऱ्यांना आठवण झाली. मुंढे यांनी महापालिकेचा कारभार स्वीकारल्यानंतर अशाच प्रकारे अचानक भेटी देऊन कारभार चव्हाट्यावर आणला होता. अनेक अधिकाऱ्यांवर जाब बसवला होता. बांगर यांच्या वाशी रुग्णालयाच्या अचानक भेटीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुंढेंच्या कामाची झलक दिसून आली.

महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक; तर 'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण जास्त...

शहरातील कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. पण जर त्यात कोणी हयगय करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वाशी रुग्णालयात भेट दिली असता काही त्रुटी दिसून आल्या. कर्मचारी व काही डॉक्टर उपलब्ध नव्हते. तापाचे सर्व रुग्ण शंभर टक्के तपासले गेले पाहिजेत. स्वच्छतेचा अभाव दिसून आला. 
- अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

----
संपादन : ऋषिराज तायडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nmmc commissioner abhijit bangar visits vashi covid hospitals, founds irreugularity