esakal | 'सकाळ‌'च्या बातमीचा परिणाम! कोरोना रुग्णांना मिळणार वेगवेगळ्या रुग्णवाहिका 
sakal

बोलून बातमी शोधा

ambulance-1

नेरूळ सेक्टर सहामधील लक्षणे नसणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि सेक्टर 10 मधील तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारा रुग्ण या सर्वांना एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रकार 25 मे रोजी उघडकीस आला होता.

'सकाळ‌'च्या बातमीचा परिणाम! कोरोना रुग्णांना मिळणार वेगवेगळ्या रुग्णवाहिका 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील लक्षणे नसणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि सेक्टर 10 मधील तीव्र स्वरूपाची लक्षणे असणारा रुग्ण या सर्वांना एकाच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात घेऊन जाण्याचा प्रकार 25 मे रोजी उघडकीस आला होता. नेरूळमधील शिवसेनेचे माजी विरोधी पक्षतेने व उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर यांनी स्वतः पुढाकार घेत रुग्णवाहिकेचा पाठपुरावा केला होता. याबाबत सत्य परिस्थिती जाणून घेत 'सकाळ'ने रुग्णांची कशा पद्धतीने गैरसोय केली जात आहे. तसेच आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे रुग्णांना होत असलेल्या त्रासाला वाचा फोडली होती. घोडेकर यांनी पालिका प्रशासनाला जाब विचारला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रारही केली होती. 

मोठी बातमी ः आता काय बोलणार! सायन हायवेवर सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

त्यामुळे अखेर रुग्णांच्या लक्षणांची तीव्रता लक्षात घेता आता रुग्णांची ने-आण करण्यासाठी वेगवेगळ्या रुग्णवाहिका महापालिकेद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. 26 मे रोजी 'सकाळ'च्या अंकात `नऊ रुग्णांचा एकत्र प्रवास' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी हा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी ः ...म्हणून मुंबई पोलिस स्टेशनमधील सॅनिटायझिंग स्प्रे मशीन हटवल्या

अण्णासाहेब मिसाळ यांनी वेगवेगळ्या रुग्णवाहिका सुरू करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहे. मिसाळ यांच्या आदेशानुसार पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांच्याकडे रुग्णवाहिकांच्या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. गर्भवती महिलांसाठी वेगळ्या रुग्णवाहिका, कोरोनाबाधित रुग्णासाठी वेगळी रुग्णवाहिका, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांसाठी वेगळी आणि संशयित कोरोनाबाधित रुग्णांसाठी वेगळी अशी रुग्णवाहिकेबाबत वर्गवारी करण्यात आली आहे. 

मोठी बातमी ः मुंबईत या पाच स्थानकांहून टॅक्सी सेवा सुरु, अशी करा टॅक्सी बुक​

कशी असेल व्यवस्था?
कोव्हिड-19 व्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांसाठी सहा रुग्णवाहिका उपलब्ध केल्या जाणार आहेत. गर्भवती महिलांच्या प्रसूतीला जाण्यासाठी प्रत्येक रुग्णालयाता एक अशा पाच रुग्णवाहिका, एनएमएमटीच्या ताफ्यातील 8 बसेसचे रुग्णवाहिकेत रूपांतर केले आहे. त्यांचा वापर कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयित रुग्णांची ने-आण करण्यासाठी केला जाणार आहे. तसेच स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून तीन अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

loading image