ऑनलाइन परवानगी मिळाली नाही, मग त्याने कुटूंबासह व्हीलचेअरवरुन घरची वाट धरली

wheelchair
wheelchair

वसई : ऑनलाईन प्रक्रियेसाठी पाठपुरावा करूनही परवानगी मिळाली नाही. रेल्वेने जायचे तर, यादीत नावही नसल्याने अखेर येथील अपंगाने पत्नी आणि मुलीसोबत व्हीलचेअरवरूनच उत्तर प्रदेश गाठाण्याच निर्णय घेतला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून त्यांने मार्गक्रमणही सुरु केले आहे. 

वसईतील दिलशाद खान अपंग आहेत. पत्नी आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग, टाळेबंदी यामुळे त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत होते. रोजगार बंद झाल्याने महिन्याभरापूर्वी उत्तरप्रदेश येथील त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. ऑनलाईन पास घेऊन जा, असा सल्ला त्यांनी काहींनी दिला. त्यानुसार त्यांनी पाठपुरावा केला, मात्र परवानगी मिळाली नाही. उत्तरप्रदेश येथे जाण्यासाठी वसईतून रेल्वे गाडी जाणार असल्याने तोही प्रयत्न केला, मात्र बाराशे लोकांची यादी तयार झाल्यावर गाडी सुटणार होती. त्यासाठीही ते थांबले, परंतु यादीत नावचं आले नाही. अखेर कानपूरला पोहचण्यासाठी त्यांनी पत्नी आणि मुलीसह भर उन्हात चटके सोसत महामार्गावरून प्रवासाला सुरुवात केली.

पत्नीच्या हातात सामानाची पिशवी, तर मुलगी पित्याच्या व्हीलचेयरला ढकलत नेत आहे. काही नागरिक, सामाजिक संस्थांनी त्यांना मदतीचा हात देत खाण्यापिण्याच्या वस्तू दिल्या. कोरोना विषाणूने नागरिकांचे हाल होत असल्याने गावची ओढ स्वस्थ बसू देत नाही. त्या ओढीपायी जिद्दीने पुढे जाण्यासाठी काहींनी खडतर प्रवासाचा मार्ग निवडला आहे. 

गावी जाण्यासाठी ऑनलाईन, ट्रेन आदी प्रयत्न केले, मात्र यश आले नाही. त्यामुळे महामार्गावरून कुटुंबियांसोबत निघालो आहे. उत्तरप्रदेशमधील कानपूरला गाव आहे. थोडी विश्रांती घेत गावाकडे जाणार आहे. 
- दिलशाद खान, वसई

Not getting permission online, then he go for Uttar Pradesh on a wheelchair

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com