मोठी बातमी : आता धारावीतील लक्षणं नसलेल्या रुग्णांवर चिनी पद्धतीने होणार उपचार, जाणून घ्या काय आहे ही पद्धत

dharavi
dharavi

मुंबई: आशिया खंडातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे आता इथल्या रुग्णांना बरं करण्यासाठी एक विशेष पद्धत वापरण्यात येणार आहे. 

सर्जरीनं धारावीतील लक्षण नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांवर आता चिनी पध्दतीने उपचार करण्यात येणार आहे. ठराविक दिवसात रुग्णांच्या छातीचे एक्सरे काढून उपचारांची दिशा ठरविण्यात येणार आहे. हाजअली येथील नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडियाच्या कोविड केअर केंद्रांत हि पध्दत वापरण्यात येत आहे.

कोरोनाचा विषाणू  श्वसन यंत्रणेवर हल्ला करत असल्याने फफ्फूसावर त्याचा परीणाम होतो. चीनमध्ये फफ्फूसांचे एक्सरे आणि सीटीस्कॅन काढून त्यानुसार उपचारांची दिशा ठरवण्यात येत होती. त्याच पध्दतीचा वापर करत एनएससीआय कोविड केंद्रात दाखल असलेल्या रुग्णांचे दोन ते तीन दिवसांनी एक्सरे काढून उपचारांची दिशा ठरवली जात होती. त्याचे चांगले परीणामही दिसू लागले आहेत. त्यामुळे आता वरळी, बीकेसी तसेच गोरेगाव येथील एक्झीबीशन सेंटरमध्ये याच पध्दतीचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी दहा एक्सरे मशिन विकत घेण्यात येणार आहे.

एनएससीआय मध्ये एका सॉफ्टवेअरच्या मदतीने एक्सरेचा आढावा घेतला जातो. त्यामुळे फफ्फूसात लहानसा जरी बदल झाला तरी तो सहज समजू शकतो. त्यामुळे तत्काळ उपचार सुरु करता येतात असे पालिकेच्या एका डॉक्टरने सांगितले.

मुंबईतील लक्षणं नसलेले रुग्ण यात इतर दिर्घकालीन आजार नसलेले तसेच जेष्ठ नागरीक वगळून रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर मध्ये २९ हजार६२९ खाटांची सोय करण्यात आली आहे. तेथे सध्या ३ हजार ४५६ रुग्ण दाखल आहे. तर ५ हजार २९४ रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

now corona patients in dharavi will treat in china way read full story 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com